| Date: 2023-02-23

अमरावती (प्रतिनिधी):
डॉ. राजेंद्र गोडे तंत्रज्ञान व संशोधन संस्था, अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे गाडगे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गाडगे महाराज आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. राजेंद्र जी गोडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून करण्यात आली.
प्राचार्य डॉ. पाटवे, डॉ. जिरापुरे, एनएसएस प्रमुख व कार्यक्रम अधिकारी श्रीरंग कल्याणकर आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही यावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. पाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीरंग कल्याणकर, नाखले, पाटील, गळगाटे, आणि धर्माके यांनी मेहनत घेतली.